योजनेचे नाव


आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्प

केंद्र पुरस्कर/केंद्र - राज्य पुरस्कृत / राज्य पुरस्कृत


केंद्र पुरस्कृत योजना

योजना कधी सुरू झाली


शासन निर्णय क्र.संग्राम-२०१५/प्र.क्र.93 /संग्राम कक्ष/ दि.11 ऑगस्ट २०१६ अन्वये माहे डिसेंबर ,2016 पासून. View

योजनेची थोडक्यात माहिती


संपूर्ण देशभरात ई-पंचायत ( डिजीटल इंडिया मधील एक मिशनमोड विकास कार्यक्रम ),हा प्रकल्प सन २०११ पासून राबविण्यात येत आहे.केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पंचायतीराज संस्थांच्या कारभारामध्ये ई-पंचायत प्रकल्पांतर्गत अभिप्रेत असलेली एकसुत्रता व पारदर्शकता आणणे ,नागरिकांना विविध प्रशासकीय विभागांतर्गत आवश्यक असलेले सेवा दाखले त्यांच्या रहिवासी क्षेत्रात कालबध्द स्वरूपात मिळणे, तसेच इतर व्यावसायिक सेवा,बँकींग सेवा ( सर्व G2C व B2C सेवा ) ग्रामीण जनतेला एकाच केंद्रावर मिळाव्या या हेतूने माहे डिसेंबर ,2016 पासून ‘ आपले सरकार प्रकल्प ’ सर्व ग्रामपंचायतींमध्ये राबविण्यात येत आहे.

लेखाशीर्ष व वित्तीय तरतूद (वर्ष निहाय)


वित्त आयोग व ग्रामपंचायतीचा स्वनिधी इ.

योजनेच्या लाभाचे स्वरुप


नागरिकांना विविध प्रशासकीय विभागांतर्गत आवश्यक असलेले सेवा दाखले त्यांच्या रहिवासी क्षेत्रात कालबध्द स्वरूपात, तसेच इतर व्यावसायिक सेवा,बँकींग सेवा ( सर्व G2C व B2C सेवा ) ग्रामीण जनतेला एकाच केंद्रावर ग्रामपंचायतींत दिल्या जातात.

लाभार्थिची पात्रता


महाराष्ट्र राज्याचा नागरीक

अर्ज कुठे करावा


ग्रामपंचायतीत

सांख्यिकीय माहिती-तत्का (भौतिक व साध्य)


२७८८९ ग्रामपंचायतींत आपले सरकार सेवा केंद्र मार्फत सेवादाखले तसेच इतर व्यावसायिक सेवा,बँकींग सेवा इ. पुरविणे